चिंताजनक! जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ

कोरोना

पुणे – पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात नव्याने २१६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे जिल्ह्यातील एकूण संख्या आता ४ लाख ८६ हजार ०७१ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ३०४ कोरोनाबाधितांना गेल्या २४ तासात डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७४ हजार ७८१ झाली आहे. पुणे शहरात काल एकाच दिवसात ५ हजार ८८४ नमुने घेण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्याची एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख ५० हजार १६४ इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७४२ इतकी झाली आहे.

दरम्यान, कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला.

दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या –