चिंताजनक! ‘डेल्टा प्लस’चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

डेल्टा प्लस

मुंबई – देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते. अशा सर्व भीषण परिस्थितीतून सध्या संपूर्ण महाराष्ट्र सावरत असताना आता नव्या संकटाने डोक वर काढले आहे.

कोरोनाच्या तिसरा लाटेचा धोका ज्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे आहे त्याचा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरिएंट’ने भारतात बरीच हानी केली आता डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंतेचे कारण बनला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटले. भारतासह जगात नऊ देशांत सापडलेल्या या व्हेरिएंटचे देशात २२ रुग्ण समोर आले असून त्यात जळगाव आणि रत्नागिरीत १६ सापडले आहेत.

महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले असून त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्राने या राज्यांना डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध किंवा तत्सम पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाने या तीनही राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवून सतर्क केलं आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापरर्यंत एकूण ९ देशांमध्ये आढळला आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे. भारतात डेल्टा प्लसचे एकूण २२ रुग्ण सापडले आहेत. मात्र, या २२ पैकी १६ रुग्ण महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या –