चिंताजनक! जिल्ह्यात आज तब्बल ‘इतक्या’ नव्या कोरोना रुग्णांची वाढ

कोरोना

पुणे : पुणे जिल्ह्यात आज नव्याने ३४६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे जिल्ह्यातील एकूण संख्या आता ४ लाख ८४ हजार ७०२ इतकी झाली आहे. तर जिल्ह्यातील २८७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७३ हजार १२६ झाली आहे.

पुणे जिल्ह्यात आज एकाच दिवसात ९ हजार ६९७ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याची एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख ८ हजार ८८४ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या २ हजार ८६७ रुग्णांपैकी २२७ रुग्ण गंभीर तर ३८७ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

तर राज्यात आज ८ हजार १५९ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६०,६८,४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,३७,७५५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५१,५२१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ३७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या –