Site icon KrushiNama

‘या’ साखर कारखान्याने भागवली 29 करोड रुपयांची थकबाकी

साखर कारखाना

रुडकी, उत्तराखंड – लक्सर साखर कारखान्याकडून 15 एप्रिल पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ऊसाचे पैसे यापूर्वीच समितीकडे पाठवण्यात आले आहे. मुख्य व्यवस्थापक अजय कुमार खंडेलवाल यांनी सांगितले की, आता 16 ते 30 एप्रिल पर्यंतचे एकूण 29 करोड 44 लाख रुपयांची थकबाकी चेकद्वारे ऊस समितीकडे पाठवण्यात आले आहे.

लक्सर सहकारी ऊस विकास समितीचे प्रभारी सचिव गौतम सिंह नेगी यांनी चेक मिळाल्याचे सांगून, हे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. याच आठवड्यात हे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये जमा होतील येतील असे त्यांनी सांगितले.

 महत्वाच्या बातम्या –