रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….

सकाळी उठल्यावर लिंबू पाणी (Lemon water)  प्यायल्याने शरीरात एक उत्साह निर्माण होतो. दिवसभर कामांमध्ये हा उत्साह जाणवत राहतो. याशिवाय लिंबाच्या पाण्याचे शरीरासाठी अनेक फायदेही आहेत. लिंबाच्या पाण्यात मुबलक प्रमाणात विटामिन सी असतं. यामुळे यकृतासंबंधी कोणते त्रास असतील तेही कमी होतात.

याशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मध टाकून प्यावं. लिंबाच्या पाण्यामुळेही त्वचा सतेज होते. लिंबाचं पाणी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपलं रक्षण होतं.

एवढंच नाही तर पचनक्रियाही सुधारते.तसेच सकाळी उठून लिंबू पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. याशिवाय नियमितपणे लिंबाचं पाणी प्यायल्यास हाडं आणि दात मजबूत होतात.

महत्वाच्या बातम्या –