विड्याचे पानाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

विड्याचे पान

विड्याचे पान (betel leaf) भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असण्यासोबतच एक महत्त्वपूर्ण औषधीसुद्धा आहे. ग्रामीण भागात तोंडाची चव वाढवण्यासोबतच या पानांचा वापर करून विविध पारंपरिक औषधी उपाय केले जातात. आधुनिक शोधानुसार विड्याच्या पानामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच टॅनिन तत्त्वासोबत कॅल्शियम, फास्फोरस, लोह तत्व, आयोडीन आणि पोटॅशियम आढळून येते. चला तर मग जाणून घेऊ फायदे….

  • विड्याच्या पानात (betel leaf) विलायची, पेपरमिंट, लवंग, गुलकंद किंवा मध टाकून बनवलेला विडा खावा. असा विडा खाल्ल्यानं आपल्या शरीरातील आळस, थकवा दूर होतो आणि निद्रानाशाची समस्या सुद्धा पळून जाते.
  • जर आपल्याला गुडघेदुखीची समस्या असेल किंवा आपल्याला पायाला काही लागलं असेल, तर विड्याच्या पानाला तूप लावून ते तव्यावर गरम करावं. असं गरम-गरम पान त्रास होत असलेल्या ठिकाणी लावावं. त्यानं आपला गुघडा शेकला जातो आणि तिथलं दुखणंही कमी होतं.
  • श्वास घेण्यात आपल्याला त्रास होत असेल किंवा छातीत जळजळ होत असेल तर आपण पानावर तूप किंवा तेल लावून तव्यावर पान ठेवून त्यानं छाती शेकावी. असं केल्यानं कफ पण सुटतो आणि जळजळही कमी होते.
  • जर आपल्याला सर्दी झालीय तर विड्याच्या पानात लवंग टाकून ते खावे. जर पान खूप कडू लागत असेल तर आपण यात साखरेची गाठी टाकू शकतो.
  • ॲसिडीटी, अपचन असा त्रास होत असल्यास विड्याचं पान खायला द्यावं. पचनशक्ती सुधारण्यासाठी विड्याचं पान खूपच उपयुक्त ठरतं.
  •  कुठे चटका बसला असेल किंवा एखादी जखम झाली असेल तर त्या जखमेवर विड्याच्या पानांची पेस्ट आणि त्यामध्ये थोडा मध असे मिश्रण करून लावा. जखमेचा दाह कमी होईल आणि थंडावा मिळेल.

महत्वाच्या बातम्या –