Glowing Skin | त्वचेला चमकदार बनवण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Glowing Skin | टीम कृषीनामा: प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचेला चमकदार बनवण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकतात. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस चेहऱ्यावर लावू शकतात. त्याचबरोबर लिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंग, पिगमेंटेशन इत्यादी समस्या दूर होऊ शकतात. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही लिंबाचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

लिंबू आणि हळद (Lemon and Turmeric-For Glowing Skin)

चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी लिंबू आणि हळद फायदेशीर ठरू शकते. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर लिंबू आणि हळदीचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने वृद्धत्वाची लक्षणे आणि सुरकुत्या देखील कमी होऊ शकतात. लिंबू आणि हळद वापरण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर क्लीनर न वापरता लिंबू आणि हळद लावल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.

लिंबू आणि साखर (Lemon and sugar-For Glowing Skin)

लिंबू आणि साखरेचे स्क्रब त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. लिंबू आणि साखरेचे स्क्रब वापरल्याने त्वचेवरील मुरुमांची समस्या दूर होऊ शकते. लिंबू आणि साखरेचे मिश्रण वापरल्यानंतर कोरफडीचा वापर करणे टाळावा. लिंबू आणि साखरेच्या वापरानंतर कोरफड वापरल्यास त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जाऊ शकते.

लिंबू आणि तांदळाचे पीठ (Lemon and rice flour-For Glowing Skin)

तांदळाचे पीठ आणि लिंबाचा फेस पॅक त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो. लिंबू आणि तांदळाच्या पिठामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात, जे त्वचेला खोलवर साफ करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या फेस पॅकच्या मदतीने चेहऱ्यावरील चमक वाढू शकते आणि त्वचेचा रंग देखील सुधारू शकतो.

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही लिंबाचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही खालील पद्धती फॉलो करू शकतात.

लिंबाचा रस (Lemon juice-For Dark Elbow)

कोपऱ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड आढळून येते, जे त्वचेचा काळेपणा दूर करण्यास मदत करते. तुम्हाला हातांच्या कोपऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे लिंबाचा रस लावून ठेवावा लागेल. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्हाला तुमच्या हाताचे कोपरे स्वच्छ पाण्याने धुवावे लागतील. आठवड्यातून दोन ते तीन वेळा लिंबाचा रस लावल्याने कोपऱ्याचा काळेपणा दूर होऊ शकतो.

खोबरेल तेल (Coconut oil-For Dark Elbow)

खोबरेल तेल त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. त्याचबरोबर खोबरेल तेलाच्या मदतीने कोपऱ्याचा काळेपणा देखील दूर होऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोपऱ्यावर खोबरेल तेल लावून काही मिनिटं मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला खोबरेल तेल एक तास कोपऱ्यावर लावून ठेवावे लागेल. असे केल्याने कोपऱ्याचा काळेपणा हळूहळू दूर व्हायला लागतो.

कोरफड (Aloevera-For Dark Elbow)

कोरफड देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडीमध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटिफंगल गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेचा काळेपणा दूर करण्यास मदत करतात. तुम्हाला कोपऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी कोरफडीचा गर किंवा बाजारात उपलब्ध असलेले एलोवेरा जेल कोपऱ्यांवर लावावे लागेल. नियमित कोरफडीचा वापर केल्याने कोपऱ्याचा काळेपणा हळूहळू कमी व्हायला लागतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Periods Cramps | मासिक पाळीतील असाह्य वेदनांपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Digestive System | पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश

Hair Fall | ‘या’ गोष्टी थांबवू शकतात केस गळती, जाणून घ्या

Dark Elbow | हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘या’ आयुर्वेदिक पद्धती

Amla and Curd | दही आणि आवळ्याच्या मदतीने केसांच्या ‘या’ समस्या होऊ शकतात दूर