Share

८.७२ आणि ६.९२ टक्के कर्जरोखेची परतफेड ११ जानेवारी 2022 रोजी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.७२ टक्के कर्जरोखे (Debt bond) २०२२, व ६.९२ टक्के शासन कर्जरोखे २०२२ ची परतफेड दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती वित्तीय सुधारणाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

वित्त विभागाच्या अधिसुचनेनुसार ६ जानेवारी २०१२ अनुसार ८.७२ टक्के आणि ६.९२ टक्के शासन कर्जरोखे २०२२ अदत्त शिल्लक रकमेची दिनांक १० जानेवारी २०२२ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. या दिनांकास शासनाने सुट्टी जाहीर केल्यास कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी अधिदान कार्यालय करेल. या कर्जावर ११ जानेवारी पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरूपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागराकडे किंवा भारतीय स्टैट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जी त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास किंवा त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी ८.७२ टक्के आणि ६.९२ टक्के शासन कर्जरोखे २०२२ च्या धारकांनी लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावीत.

भारतीय स्टेट बँक किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोख प्रमाणपत्राच्या स्वरूपात असल्यास ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असले त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात किंवा उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करतील, असेही प्रधान सचिव यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या