मेथीचे ५ महत्वाची गुणधर्म

Published On: 

मेथीचे बीज आणि मेथीची पान सुगंधित व चविष्ट असतात. मेथीचे बीज फारच कडू असते. त्यास भाजून त्यातील कडूपणा कमी करता येते. मेथीमध्ये थायमिन, फोलिक असिड, रायबोफ्लोबीन नियासिन आयर्न, स्लेनियम, झिंक, म्यान्ग्नीज आणि म्याग्नेशियाम असते. यासोबत मेथीमध्ये जीवनसत्व k चे काही घटकपण असतात.

मेथीचे ५ महत्वाची गुणधर्म –

मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते-

काही संशोधनात असे आढळून आले आहे की मेथीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.मेथीमध्ये असलेल्या स्टेरॉईडल सेपोनिन्समुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईड चे शोषण टाळले जाते.

ह्रदयविकाराचा धोका कमी होतो-

मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या घटकामुळे ह्रदयाचे आरोग्य नियंत्रित राहते.त्याचप्रमाणे मेथीमध्ये असलेल्या पोटॅशियमुळे सोडीयमच्या कार्यावर नियंत्रित राहते ज्यामुळे हुदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतात.

ताप व घसा खवखवणे यावर गुणकारी-

ताप असल्यास मेथी एक चमचा लिंबू व मधासोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो.तसेच खोकला व घसा खवखवत असल्यास त्यावर देखील मेथी गुणकारी आहे.

स्तनपान करणा-या महिलांमध्ये दुधाचे प्रमाण वाढते-

मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन या घटकामुळे आईच्या दूधाच्या प्रमाणात वाढ होते.त्यामुळे स्तनपानकरणा-या महिलांना मेथी खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

केसांच्या समस्या कमी होतात-

मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.केस गळत असल्यास अथवा पातळ असल्यास दररोज तुमच्या कोकनट ऑईलमध्ये मथी दाणे रात्रभर भिजत ठेवा व नंतर केसांना त्याचा हलक्या हाताने मसाज करा.मेथींमुळे केसांमधील कोंडा देखील कमी होतो.

भाजीपाला (Vegetables) बातम्या
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या