पोटातील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या

Published On: 

१. कमी प्रमाणात खा : जर तुम्हाला एकादाच भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडा. आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकवेळी पोटभर न जेवता थोडं-थोडं खा.

२. मॉर्निंग वॉक : पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करा यामुळे पोटातील चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

३. रात्री उशिरा जेवू नका : रात्री उशिरा जेवन करणे हे पोटातील चरबी वाढण्याचं मुख्य कारण आहे. रात्री झोपण्याच्या 2 तासाआधी जेवा. रात्रीचं जेवन खूपच लाइट असावं. झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका.

४. गरम पाणी : पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे अतिशय फायदेशीर आहे. यामुळे कॅलरीज कमी होतात. गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्याने ते आरोग्यासाठी आणखी लाभदायक ठरतं.

५. योग : योगा केल्याने शारीरिकच नव्हे तर मानसिक तक्रारीदेखील दूर होतात. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या