Share

तेजस ठाकरे यांनी शोधल्या दुर्मिळ खेकडय़ाच्या आणखी ११ प्रजाती

Published On: 

krushinama logo defult image

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी आणखी काही खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस यांनी तब्बल 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला. खेकड्यांच्या प्रजातींबद्दलचा त्यांचा हा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाला आहे. तेजस ठाकरे यांनी यापूर्वीही खेकड्यांच्या काही प्रजातींचा शोध लावला आहे.

तेजस ठाकरे यांनी खेकडय़ांच्या तब्बल ११ प्रजाती शोधल्या असून त्यात एक गोडय़ा पाण्यातील जातही आहे. न्यूझीलंडच्या ‘झुटाक्सा’ हे नियतकालिक आणि वेबसाईटवर तेजस ठाकरे यांचं दुर्मिळ खेकड्यांविषयी दुसरं संशोधन प्रसिद्ध झालं आहे. विशेष म्हणजे पश्चिम घाटातील ‘सह्याद्री’ या मराठी नावावरुन एका खेकड्याचं ‘सह्याद्रियाना’ असं नामकरण करण्यात आलं आहे.

तेजस ठाकरे यांनी याआधीही खेकडय़ांच्या अनेक प्रजातींचा शोध लावला आहे. त्यांच्या टीमने खेकडय़ांच्या विविध प्रजातींचा शोध घेण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या टीमचे तेजस ठाकरे यांनी आभार मानले आहेत. आपल्या घरापासून कित्येक दिवस, आठवडे दूर राहून प्रत्यक्षात दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकून आपल्याला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी या टीमचे आभार मानले आहेत. डोंगरदऱ्यांमध्ये, जंगलामध्ये फिरण्याची परवानगी, शोधमोहिमेसाठी लागणारे साहित्य, सर्वप्रकारची मदत वन विभागाने केली. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये दुर्मिळ खेकड्यांच्या शोधामुळे वन्य जीव संपत्ती जतन करण्याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असून त्याचं संवर्धन अत्यंत गरजेचं असल्याची प्रतिक्रिया तेजस ठाकरे यांनी व्यक्त केली.

कोकण, सातारा, कोल्हापूर आणि नगर या ठिकाणी फिरून तेजस ठाकरे यांनी या दुर्मिळ जातीच्या खेकडय़ांच्या प्रजातींचा शोध लावला.

दुर्मिळ ११ प्रजाती

  • घाटीयाना बोट्टी
  • घाटीयाना पल्च्रा
  • घाटीयाना रथब्युने
  • गुबेरनाटोरीयाना लॉँगीपेस
  • गुबेरनाटोरीयाना मार्लेश्वरेनेसीस
  • गुबेरनाटोरीयाना वालासेई
  • सह्याद्रीयाना बिल्यारजानी
  • सह्याद्रीयाना पाछेपालूस
  • सह्याद्रीयाना सह्याद्रीनेसीस
  • सह्याद्रीयाना टेन्यूफालस
  • सह्याद्रीयाना वुडसासोनी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या