आमसूल खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

आमसूल किंवा कोकम हे आंबट फळ आमटी, भाजीत वापरले जाते. आमसुलाची झाडे गोवा, कोकण, केरळ, कर्नाटक या भागांत येतात. या झाडाच्या फळांना कोक म आणि फळावरच्या सुकवलेल्या सालींना आमसूल किंवा कोकम म्हणतात. आमसुलापासून सरबत, चटणी, सार बनवले जाते. वरण, भाजीला आंबटपणा येण्यासाठी  आमसूल वापरले जाते. चिंचेपेक्षा आमसूल अधिक गुणकारी आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे…

  • हृद्यासंबंधी समस्या दूर करण्यासाठी आमसूल लाभकारी आहे. यामध्ये असणाऱ्या पोटॅशियममूळे हृद्यासंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे आमसूल सेवन उपयुक्त असतो
  • हिवाळ्यात त्वचेला, तळहात, तळपायास भेगा पडतात. त्यावर हे तेल गरम करून लावतात. मलम तयार करण्यासाठी कोकम तेल वापरतात.
  • डोळे हे आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण घटक मानले जाते. आमसूल मध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन इ जास्त प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या दृष्टीसाठी लाभदायक असते.
  • ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे अशांसाठी आमसूल फायदेमंद ठरू शकते. आमसूल मध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सिडेंट पचन क्रिया सुधारण्यास मदत करते. ज्यामुळे वजन कमी होण्यात मदत होते.
  • नियमितपणे आमसूल पावडरचा सेवन केल्याने रक्तातील साखरेचा प्रमाण नियंत्रित ठेवण्यात मदत होते.

महत्वाच्या बातम्या –