Share

Fish Eating Benefits: आठवड्यातून ३ वेळा मासे खाल्ल्याने टळतात ‘हे’ गंभीर आजार

Published On: 

Fish Eating Benefits: आठवड्यातून ३ वेळा मासे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Fish Eating Benefits: तुम्हाला माहितीये का, तुमच्या ताटातील माशाचा एक तुकडा तुम्हाला हृदयविकार आणि अल्झायमरसारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचवू शकतो? होय, हे अगदी खरंय.

नुकत्याच समोर आलेल्या एका वैद्यकीय संशोधनातून ही मोठी माहिती उघड झाली आहे. आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा मासे खाणं आरोग्यासाठी अक्षरशः वरदान ठरतं. याने वजन नियंत्रणात राहतं. सोबतच, शरीराला भरपूर प्रथिने (Protiens) मिळतात.

ओमेगा ३ ची कमाल आणि मासे खाण्याचे फायदे

माशांमधून शरीराला ‘ओमेगा ३ फॅटी ॲसिड’चा मुबलक पुरवठा होतो. यामुळे रक्तदाबाची (Blood Pressure) समस्या दूर होते. शरीरात रक्त साकळून राहत नाही. त्यामुळेच, हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

दुसरीकडे, वाढत्या नैराश्यासारख्या (Depression) मानसिक समस्येवरही मासे अत्यंत गुणकारी आहेत. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांच्या आहारात ‘ओमेगा ३ फॅट्स’ जास्त असतात, त्यांच्यात नैराश्याची लक्षणे तब्बल ३० टक्क्यांनी कमी आढळतात.

वाढत्या वयानुसार डोळ्यांची दृष्टी कमजोर होण्याचा मोठा धोका असतो. पण, आहारात माशांचा समावेश केल्यास डोळ्यांच्या स्नायूंवरील ताण कमी होतो. थोडक्यात सांगायचं तर, आठवड्यातून किमान दोनदा माशांवर ताव मारल्यास ‘डिमेंशिया’ आणि ‘अल्झायमर’ यांसारख्या विस्मृतीच्या आजारांचा धोकाही टळतो.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याआरोग्य
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या