Share

कांदा आणि लसणाची पेस्ट: केसगळती थांबवून केसांवर नैसर्गिक चमक आणणारा सोपा घरगुती उपाय

Published On: 

Hair Fall Control Tips: Natural home remedy ingredients like onion, garlic, and egg for healthy hair growth.

केसगळतीमुळे तुम्हीही त्रस्त आहात का? महागडे शॅम्पू आणि तेल वापरूनही काहीच उपयोग होत नाहीये? मग थोडं थांबा. वाढतं प्रदूषण. संप्रेरकांमधील असंतुलन यामुळे आजकाल अकाली केस गळण्याचं प्रमाण भयंकर वाढलंय.

बाजारात मिळणारी हजारो रुपयांची प्रसाधनं अनेकदा कुचकामी ठरतात. पण तुमच्या स्वयंपाकघरातच यावर एक भन्नाट आणि खात्रीशीर उपाय दडलेला आहे. हा उपाय अगदी साधा असला, तरी त्याचे परिणाम खरोखरच थक्क करणारे आहेत.

Hair Fall Control Tips: केसगळती थांबवणारा घरगुती आणि रामबाण उपाय

यासाठी फक्त तीन गोष्टी लागतील. एका कांद्याचा रस, पाच लसणाच्या पाकळ्या आणि एका अंड्याचा पिवळा बलक. लसूण चांगला ठेचून घ्या. त्याची पेस्ट कांद्याच्या रसात मिसळा. नंतर त्यात अंड्याचा बलक टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.

आता ही पेस्ट केसांच्या मुळांना हलक्या हाताने लावा. अर्धा तास तसंच राहू द्या. त्यानंतर केस स्वच्छ धुवा. थोडक्यात सांगायचं तर, महिन्यातून फक्त एकदा हा उपाय केल्यास केसगळती तर थांबेलच, शिवाय केसांवर एक उत्तम नैसर्गिक चमकही येईल.

महत्त्वाची टीप: बातमीत दिलेले घरगुती उपाय हे केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. केसगळतीवर कोणताही उपाय थेट करून पाहण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या