Share

जाणून घ्या अक्रोडचे गुणकारी फायदे

Published On: 

🕒 1 min read

अक्रोड खाल्ल्याने नैराश्याचा धोका कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. दररोज अक्रोड खाल्ल्याने एकाग्रताही वाढत असल्याचे समोर आले आहे. अक्रोड खाल्याने शरीरातील उर्जा वाढवण्यास तसेच मन एकाग्र होण्यासही मदत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अक्रोडच्या सेवनाने मानसिक तणाव कमी होतो तसेच बुद्धी तल्लख होण्यासह मदत होते. अक्रोडचे सेवन केल्याने कॅन्सर, हृदयरोग आणि इतर काही आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते.

जाणून घ्या जवसाचे फायदे…

अक्रोड खाल्याने कोलेस्ट्रोल कमी होते आणि हृदयासंबंधी आजारांपासून बचाव होतो. अक्रोड खाल्ल्याने कॅलरी संबंधीत समस्या कमी करण्यास देखील मदत होते. अक्रोड अॅन्टीऑक्सिडन्ट आहे. अक्रोड एकमेव असा मेवा आहे, जो ओमेगा-३ फॅटी ऍसिड, अल्फा-लिनोलेनिक ऍसिडचा जबरदस्त स्त्रोत आहे. ओमेगा-३ फॅटी ऍसिड मेंदूतील अॅक्टिव्हिटी वाढवण्यास मदत करते. अक्रोडमधील अॅन्टीऑक्सिडन्ट आणि प्रोटीन शरीरासाठी गुणकारी ठरतात.

हे आहेत पेरू खाण्याचे फायदे

अक्रोडमध्ये कॅलरीज्, कार्बोहायड्रेट्स असतात जे वजन वाढवण्यासाठी मदत करतात. हाडं आणि दात मजबूत करण्यासाठीही अक्रोडचे सेवन फायदेशीर ठरते. अक्रोडमुळे मधुमेहाचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो. अक्रोडमधील गुणधर्म रक्तप्रवाह सुरळित ठेवतात. दररोज अक्रोड खाल्ल्याने त्वचा चमकदार, तजेलदार होण्यास मदत होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News) आरोग्य

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या