जाणून घ्या मोसंबी खाण्याचे ‘हे’ फायदे

मोसंबी हे लिंबू वर्गातील आंबट-गोड फळ आहे. हे अतिशय गुणकारी फळ असून त्यात ए, बी आणि सी जीवनसत्त्व आहेत. शर्करा आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. चवीला आंबट-गोड असल्याने अधिक गुणकारी असतं. चला तर मग जाणून घेऊ फायदे….

फणस खाण्याचे हे आहेत फायदे; जाणून घ्या

  • मोसंबीमध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा, केस, डोळे यासाठी ते अधिक फायदेशीर ठरतात. मोसंबीचं नियमित सेवन केल्यास त्वचा उजळते.
  • रस घेण्यामुळे पोटातील आम्लता दूर होते, भूक लागते व पचनाच्या तक्रारी दूर होतात.
  • वजन कमी करण्यासाठी मोसंबी अधिक फायदेशीर ठरते. नियमित कोमट पाण्यात मोसंबीचा रस आणि मध एकत्र करुन प्यायल्याने लाभ होतात.
  •  मोसंबीचा ज्युस हा आरोग्यासाठी खूपच चांगला असतो. मोसंबीमुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते. मोसंबीमुळे शरिरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरिरातील शक्ती वाढवण्यासाठी मोसंबीचा ज्यूस फायदेशीर आहे.
  • शरीरात कोणत्याही कारणाने रक्‍तदोष निर्माण झाला, तर काही दिवस तरी नियमाने रस घ्यावा.

महत्वाच्या बातम्या –

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या

कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय