Share

जाणून घ्या मनुके खाण्याचे ‘हे’ फायदे

Published On: 

वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये सुकामेवा खाणे फायद्याचेच ठरते. मात्र, हिवाळ्यात सुकामेवा शरीरातील ऊब टिकवण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यातही खास करुन मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते. मनुक्यामधील लोह, पोटॅशियम आणि तंतू (फायबर) रक्तदाब कमी करुन पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात. मनुका हा मधुर, शीतल, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक असतो. चला जाणून घेऊ फायदे….

कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय

  • मनुक्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची क्षमता असते. त्यामुळेच ताप आल्यावर मनुके खावेत. ताप लवकर उतरण्यासाठी मनुक्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
  • मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो
  • मनुक्यामध्ये बोरॉन नावाचा रासायनिक घटक असतो जो सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त ठरतो.
  • दिवसातून दोन वेळा मनुक्यांचे व्यवस्थित चावून सेवन केल्यास ते गळ्यासाठी फायद्याचे असते.
  • मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तासंदर्भातील आजारांवर मनुका गुणकारी ठरतो. रात्री पाण्यात भिजत ठेवलेला मनुका सकाळी खालल्यास रक्ताच्या कमतरता संदर्भातील अॅनिमिया आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

महतवाच्या बातम्या –

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी नियमित खा ‘भाकरी’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या