मटकी लागवड पद्धत

  • हलकी व मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.
  • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.
  • हेक्टरी ५ टन शेणखत / कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.
  • हेक्टरी बियाणे प्रमाण : १२ ते १५ किलो.
  • पेरणी अंतर : दोन ओळीत ३० सें.मी. व दोन रोपात १० सें.मी. ठेवावे.
  • बीजप्रक्रिया – १ किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डेझीम चोळावे यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धन १० ते १५ किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
  • १२-१५ किलो नत्र आणि २५-३० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्र द्यावी. म्हणजेच ७५ किलो डीएपी प्रति हेक्टर प्रमाणे पेरणी करताना खत द्यावे.
  • पीक २०-२५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी.
  • पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.
  • सुधारित वाण :

.नं.

वाण

प्रसाराचे वर्ष

पिकाचा

कालावधी

उत्पादन

क्विं./हे.

वैशिष्ट्ये

लागवडीचा

प्रदेश

मटकी वाण
१. एमबीएस १९८९ १२५ – १३० ६ – ७ केवडा रोगास

प्रतिकारक

पश्चिम महाराष्ट्र

मोहरी लागवड पद्धत