Share

घरातच फुलवली मशरूमची शेती; जागेअभावी जोडप्याने शोधला कमाईचा भन्नाट मार्ग

Published On: 

Mushroom Farming at Home: Fresh white mushrooms growing in hanging plastic bags inside a dark room.

व्यवसाय करायचाय? पण जागा आणि भांडवल नाही? हीच चिंता अनेकांना सतावते. पण जमशेदपूरच्या एका जोडप्याने यावर भन्नाट तोडगा काढलाय. त्यांनी चक्क आपल्या घरातच शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

दिलीप वर्मा आणि त्यांची पत्नी संगीता. या दोघांना स्वतःचा काहीतरी बिझनेस करायचा होता. हाती पुरेसा पैसा नव्हता. जागाही मर्यादित होती. मग करायचं काय? त्यांनी हार मानली नाही. थेट घरातच मशरूम पिकवण्याचा निर्णय घेतला. आज ते याच छोट्याशा जागेतून उत्तम कमाई करत आहेत.

कमी जागेत फुलवली मशरूम शेती (Mushroom Farming)

घरातल्या एका खोलीत त्यांनी मशरूमसाठी खास जागा तयार केली. नियम एकच होता. थेट सूर्यप्रकाश आत येता कामा नये. आतमध्ये पंखे लावले. खोलीचं तापमान अगदी नियंत्रणात ठेवलं. कारण अति थंडी किंवा भयंकर उकाडा, दोन्ही मशरूमच्या पिकासाठी मारक ठरतात. या सगळ्याचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी लागवडीला सुरुवात केली.

थोडक्यात सांगायचं तर, त्यांची ही पद्धत अगदी सोपी आणि कल्पक आहे. मशरूमच्या बिया आधी गवतात गुंडाळून भिजवल्या जातात. नंतर त्या सुकवून प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरतात. या पिशव्या खोलीत लटकवून ठेवल्या जातात.

पुढचा महिनाभर पाण्याचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं असतं. यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या इंजेक्शनचा आणि फवाऱ्याचा वापर करून बियांना दिवसरात्र पाणी दिलं जातं. दिलीप यांनी सांगितल्यानुसार, अवघ्या एका महिन्यातच या पिशव्यांमधून ताज्या मशरूमचं पीक हाती येतं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
यशोगाथा (Success Stories)बातम्या
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या