केस गळण्याची समस्या आहे तर या ५ गोष्टी ठरतील फायदेशीर

आजच्या धावपळीच्या जीवनात केसांचं पोषण होणं खूप गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यामुळेच केस मोठ्या प्रमाणात गळतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. केस धुण्याच्या आधीही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. केस धुण्याआधी खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरु शकतात. -अंघोळीआधी केसांना दही आणि अंडं यांचे मिश्रण लावावे. हे मिश्रण कंडिशनर म्हणून काम करते. हे सर्वोत्कृष्ट … Read more

उचकी घालवण्यासाठी घरगुती उपाय

उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो काही वेळेस ही उचकी थांबते तर काही वेळेस नाही. कित्येकदा उचकी लागल्यास आपण लगेचच पाणी पितो. उचकी येण्याची अनेक कारण असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. असे मानले जाते की, डायफ्रामची मसल्स अचानक अकुंचन पावल्याने उचकी सारखी स्थिती निर्माण होते. म्हणून उचकी थांबण्यासाठी काही घरगुती उपाय … Read more

घसा खवखवण्यावर त्वरित करा ‘हे’ उपाय !

हवामानतल्या बदलांचा परिणाम शरीरावर होत असतो. सध्या राज्यात कुठे कडाक्याची थंडी, कुठे पाऊस, गारपीट तर कुठे दुपारी चांगलं ऊन असं वातावरण आहे. या वातावरणात व्हायरल इन्फेक्शन व्हायचं प्रमाण वाढतं. घशाची खवखव हे पुढच्या आजारपणाचं लक्षण असतं. घसा खवखवणं हा आजार साधा दिसत असला तरी यामुळे अस्वस्थ व्हायला होतं. नेहमीचं काम करणं अवघड होतं. वेळीच इलाज … Read more

हापूस आंबा यंदा एकाच वेळी बाजारपेठेत

साधारणतः जानेवारीमध्यापासून सुरू होणारा हापूस आंबा काढणी हंगाम यंदा एप्रिलमध्ये होणार आहे. उशिराच्या आगमनामुळे हापूस आंब्याचे बाजारपेठीय आणि निर्यातीचे गणित बदलणार असून, ऐन एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये आवक होण्याचे संकेत आहेत. मात्र, यामुळे निर्यात वाढीचीही शक्यता असल्याने काही अंशी बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.  यंदा मॉन्सूनचा दीर्घ मुक्काम, ऐन मोहोर लागण्याच्या अवस्थेत झालेला अवकाळी पाऊस, लांबलेली … Read more

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी

गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील थंडीच्या वाढलेल्या कडाक्याने विविध भाजीपाल्याचे उत्पादन तुलनेने घटल्याने आवक मंदावली आहे. परिणामी बटाटा, भेंडी, गवार, टोमॅटो, पावटा, सिमला मिरची आणि घेवड्याच्या दरात वाढ झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये … Read more

अहमदनगरमध्ये कांदा साडेपाच हजारांवर स्थिर

गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले कांद्याचे दर गेल्या आठवडाभरापासून बऱ्यापैकी खाली आले आहेत. सध्या नगरसह अन्य बाजार समित्यांत कांद्याचे दर ५०० रुपयांपासून सुरू होत असून, साडेपाच हजारांवर स्थिर आहेत. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस लिलाव होत असतात. नगर जिल्ह्यामधील बहुतांश बाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर कमालीचे वाढले … Read more

नांदेड, परभणी, हिंगोलीत हमीभावाने ४५०० क्विंटल मूग खरेदी

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ९५६ शेतकऱ्यांकडून ४ हजार ५९३ क्विंटल मूग खरेदी किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या तीन जिल्ह्यांतील ४५९ शेतकऱ्यांना १ कोटी ११ लाख ९९ हजार २४० रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अजून एकूण ४९७ शेतकऱ्यांचे २ कोटी ११ लाख ८१ हजार ४१० रुपये रकमेचे चुकारे येणेबाकी … Read more

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला गती येईल

आटपाडी आणि मिरज पूर्व भागात द्राक्षे काढणीला आली आहेत. जिल्ह्यात केवळ पाच टक्के हंगाम सुरू आहे. द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. परंतु, मॉन्सूनोत्तर पावसाने द्राक्षाचे नुकसान झाले असल्याने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला गती येईल. यंदा द्राक्षाला चांगले दर मिळतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या आटपाडी आणि मिरज पूर्व भागात द्राक्ष … Read more

मध आणि मनुके आरोग्यास लाभदायक

बदलत्या वातावरणामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत. या आजारावर मनुके आणि मध अत्यंत उपयोगी ठरतात. मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स अनेक आजारांचा मात करण्यास मदत करतात. ही सर्व पोषकतत्वे शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. अधिक त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक … Read more

जाणून घ्या अंजीर खाण्याचे फायदे….

अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. अंजीर पाण्यात भिजवून खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत होते. नियमित १० दिवस  भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अनेक समस्या दूर … Read more