हिरड्या मजबूत तर दात मजबूत!

दातांची काळजी घेण्याबरोबरच हिरड्यांचीही काळजी घेणे गरजेचे असते. यावर दातांचं आरोग्य अवलंबून असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे दातांची मजबुती ही स्वच्छतेवर अवलंबून असते. हिरड्या अस्वच्छ असतील, यामुळे दात तुटणे, रक्त येणे अशा अडचणी येतात. जेवण केल्यानंतर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अनेक जण दात स्वच्छ करत नाहीत. निदान चुळ भरणे चरी आवश्यक असते, ते देखील अनेक लोक करत नसल्याने, दातांवर घट्ट स्तर निर्माण होतो.

दही खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी कच्च्या भाज्या चावून खाव्यात. ‘सी’ जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे, यामुळे हिरड्या मजबूत होतात. आवळा, संत्री तसेच मोसंबी अशी फळे खाणे दातांसाठी नेहमीच चांगले असते. दात अधिक मजबूत ठेवण्यासाठी दिवसातून दोनवेळा दात घासणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या –

मेथीची भाजी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे