Share

नांदेड विभागात साडेनऊ लाख क्विंटलवर साखर उत्पादन

Published On: 

नांदेड विभागात साडेनऊ लाख क्विंटलवर साखर उत्पादन

🕒 1 min read

नांदेड विभागातील यंदाच्या हंगामात ऊस गाळपाचे परवाने मिळालेल्या १७ पैकी १३ साखर कारखान्यांनी पर्यंत केलेल्या ऊस गाळपाची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास सादर केली. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील ५ पैकी ३ खासगी साखर कारखान्यांनी २ लाख २२ हजार २४५ टन उसाचे गाळप केले.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराचा फटका सोसावा लागणार

सरासरी ९.४२ टक्के उताऱ्याने २ लाख ९३ हजार ३४० क्विंटल साखर उत्पादन घेतले. पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक १०.१९ टक्के आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३ सहकारी आणि १ खासगी साखर कारखान्याने ३  लाख १४ हजार ९४७ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.४६ टक्के उताऱ्याने ३ लाख २९ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादन घेतले. शिरूर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.१२ टक्के आला.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गहू पेरणीवर जोर

नांदेड जिल्ह्यातील ४ पैकी २ सहकारी आणि २ खासगी साखर कारखान्यांनी एकूण २ लाख ७३ हजार ६८५ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.४९ टक्के साखर उताऱ्याने २ लाख ५९ हजार ६५० क्विंटल उत्पादन घेतले. २ खासगी साखर कारखान्यांनी १ लाख ८८ हजार १७० टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.५२ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ७९ हजार ५० क्विंटल साखर उत्पादन घेतले. सिध्दी शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ९.४१ टक्के आला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याबाजारभाव (Market Prices)

Join WhatsApp

Join Now
नांदेड विभागात साडेनऊ लाख क्विंटलवर साखर उत्पादन

🕘 संबंधित बातम्या