Pesticide Spraying: सर्वात महत्त्वाचं म्हणजे कीटकनाशकाचा डबा. त्यावरचा रंग आधी ओळखा. लाल रंगाची खूण असलेलं कीटकनाशक भयानक विषारी असतं. त्यानंतर पिवळा, निळा आणि हिरवा असा क्रमांक लागतो. हिरव्या रंगाचं औषध तुलनेने कमी विषारी असतं. लेबल आणि माहितीपत्रक वाचल्याशिवाय फवारणीला सुरुवात करूच नका.
उघड्या अंगाने फवारणी करणं कटाक्षाने टाळा. अंगावर संरक्षक कपडे, पायात बूट, हातमोजे आणि नाकावर मास्क असणं अनिवार्य आहे. तणनाशकाचा पंप चुकूनही पिकांच्या फवारणीसाठी वापरू नका. फवारणी नेहमी हवेच्या दिशेने किंवा हवा शांत असताना करा. यासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळच निवडा.
जास्तीची मजुरी मिळेल या आशेने एकाच व्यक्तीने मोठ्या क्षेत्रावर सलग फवारणी करू नये. हे जीवावर बेतू शकतं. दररोज सलग फवारणीचं काम करणंही टाळा. काम संपल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत. तरीही जर विषबाधा झालीच, तर डब्यावरील माहितीपत्रक सोबत घेऊन थेट डॉक्टर गाठा. थोडक्यात सांगायचं तर, शेतकऱ्यांनी आता स्वत:ची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










