Share

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 88 रुग्णांची नोंद ; ओमायक्रॉनचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे.

तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)  7 हजार 447  नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळे (Corona) 3९१ लोकांचा मृत्यू झाला. देशात सध्या 86 हजार 415  सक्रिय रुग्ण आहेत. तसेच  देशात  3 कोटी 41 लाख 62 हजार 765 हजार रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. तर आतापर्यंत  देशात तब्बल  4 लाख 76 हजार 869  रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत महाराष्ट्र राज्यात  ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा कहर सुरूच आहे. महाराष्ट्रात सध्या ओमायक्रॉनचे 32 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.

जस्थानमध्ये 17, दिल्लीत 10, केरळात 5, गुजरातमध्ये 5, कर्नाटकात 8, तेलंगणात 7, पश्चिम बंगालमध्ये 1, आंध्र प्रदेश 1, तामिळनाडूत 1 आणि चंदिगढमध्ये 1 रुग्ण आढळून आले आहेत.  तर यामुळे देशातील ओमायक्रॉनच्या संख्येत वाढ झाली आहे , तर देशातील ओमायक्रॉनची (Omycron)  संख्या  88  वर गेली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या