विंचूर एमआयडीसीत प्रतिवर्षी १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून शेतमाल निर्यात केला जाणार

निफाड तालुक्यातील विंचूर येथे सुरू झालेल्या अन्नप्रक्रिया उद्योगाचा प्रकल्प उभा राहिला आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी सुमारे १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून सदर शेतमाल निर्यात केला जाणार आहे.  या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एमआयडीसीचे अधिकारी आणि शेतकऱ्यांसमवेत बुधवार (ता. १४) विंचूर येथील अन्नप्रक्रिया उद्योगाला भेट दिली. या अन्नप्रक्रिया उद्योगासाठी सुमारे १०० कोटी गुंतवणूक करण्यात येत आहे. तसेच हा आशिया खंडातील सर्वात मोठा अन्नप्रक्रिया उद्योग या ठिकाणी साकारला जात आहे.

तसेच या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची यंत्रसामग्री बसवून शेतमालावर प्रक्रिया करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने पांढरा कांदा, मका, वटाणा, गाजर, लसूण, फ्लॉवर इत्यादी शेतमालावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रकल्पात शेतीमालासोबतच प्रामुख्याने कांदा निर्जलीकरण प्रकल्प साकारण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार शेतकऱ्यांबरोबर करार करण्यात आला आहे.

राज्यात पिकणाऱ्या कांद्याच्या उत्पादनापैकी ६० टक्के उत्पादन हे लासलगाव व येवला येथून होत असते. या ठिकाणी शेतमालाचे १० हजार टन क्षमतेचे गोडाऊन उभारण्यात आले आहे. यामध्ये टिकाऊ माल जास्त काळ साठवला जाईल तसेच कांद्यावर त्वरित प्रकिया केली जाईल, प्रकिया त्वरित केल्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळणार असून कांद्याचे नुकसान टळणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांना कृषी योजनांची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी ‘महाडीबीटी’ हे नव पोर्टल विकसीत

काँग्रेस नेत्यापासून आमच्या जीवाला धोका, आमदारांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग सुरु झाल्याने शहरात इंधन दाखल – दौलत देसाई