कोरफडचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

कोरफड

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहीची शिफारस आहॆ.

कॊरफड ही एकाच अॅलो नावाच्या कुळातल्या ५०० प्रजातींपैकी एक प्रजाती आहे. याकुळात काही पुष्पवंत वनस्पतीदेखील येतात. सर्वात परिचित प्रजाती म्हणजे कोर्या व्हेरा, किंवा “खरी कोरफड” होय.मिश्रित फार्मास्युटिकल उद्दिष्टांसाठी तथाकथित “कोरफड व्हेरा” प्रमाण मानली जाते. अॅलो फेरोक्ससारख्या इतर प्रजातींची लागवड आणि कापणी जंगलांमधून केली जाते. चला तर जाणून घेऊ फायदे…..

कोरफडीचे फायदे –

  • कोरफडीच्या पाच मिलिलीटर रसात अर्धा चमचा मध घालून रोज सकाळी नाशत्यापूर्वी घ्यावा. त्यामुळे भूक लागते.
  • कोरफडीच्या रसात सैंधव मीठ (एक चमचाा रस + चिमूटभर मीठ) घालून सकाळ-रात्री दिल्सास कफ, खोकला, डांग्या खोकला थांबतो. दम्याने मुलांचे पोट उडते. त्यावर कोरफडीच्या रसात तूप व मध घालून वारंवार चाटवावे. दम कमी होतो. पोट उडणे थांबते.
  • रोज बारीक ताप, भूक न लागणे, वजन कमी होत जाणे, थकवा वाढत जाणे यावर मध आणि पिंपळी चूर्णातून कोरफड रसाचा खूपच चांगला उपयोगा होतो.
  • यकृत-प्लीहा वाढणे (लिव्हर व स्पलीन) तसेच जलोदर यांसारख्या जुनाट व भयंकर व्याधीतही कोरफड अत्यंत उपयोगी आहे.
  • नाकातून वारंवार रक्त येणे, अनेक प्रकारचे त्वचाविकार, पित्त उठणे, रक्ताच्या गाठी, खाज -खरूज- फोड यासाठी मंजिष्ठ, हळद आणि कोरफडीचा उपयोग होतो.
  • डोळे येणे, मूळव्याधीची आग किंवा ठणका, मार लागून रक्त साखळणे, भाजलेल्या जागेची आग होणे अशा विकारांत कोरफडीचा गर बाहेरून लावल्यानेही खूप उपयोग होतो.
  • कोरफडाच्या गरापासून बनविलेला ‘काळा वोळ’ हा स्त्रियांच्या पाळीच्या विकारांत अत्यंत गुणकारी आहे.

महत्वाच्या बातम्या –