तुळशीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून पुजा केली जाते. तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक उर्जाच प्राप्त होत नाही, तर ब-याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे. तुळस हे फक्त एक हिरवं रोप नसून तिच्यातील अनेक औषधी गुणधर्मांमुळे गंभीर रोगांशीदेखील सामना करणं सोपं होतं म्हणूनच तिला ‘क्वीन ऑफ हर्ब्स’ देखील म्हटलं जातं. विविध आजांरावर गुणकारी असणारी ही तुळस सौंदर्याच्या दृष्टीने त्वचा आणि केस यासाठीही लाभदायक ठरते. चला तर जाणून घे तुळशीचे आरोग्यदायी फायदे….

दही खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

  • तुळस दिवसभराचा थकवा दूर करते. अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून, उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम मिळून तणाव कमी होण्याची शक्यता असते.
  • तुळशीत मोठ्या प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-इंफ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात. दररोज तुळशीची पानं खाल्ल्याने फ्लूचा धोकाही दूर होण्यास मदत होते.
  • तुळशीचा काढा सर्दी-खोकल्यावर रामबाण मानला जातो. काढा बनवण्यासाठी तुळशीची पानं पाण्यात टाकून त्यात काळी मिरी आणि खडीसाखर मिसळून त्याचे सेवन करा. सर्दीसाठी हा काढा अतिशय गुणकारी ठरतो.
  • लहान बाळांना तापा असल्यास तुळसतेलाने आंघोळी आधी बाळाच्या अंगाची तेल मालीश केल्यास ताप कमी होतो. तुळशीत प्रतिजैविके आणि वेदनानाशके असतात त्यामूळे तापावर तूळसपाने खाल्ल्यानेही आराम मिळतो
  • तुळशीच्या पानांचा उपयोग आपण मुखवास म्हणूनही करू शकतो. तोंडातून दुर्गंध येणे, चव नसणे, तोंड कोरडे पडणे यांवर उपाय म्हणून तुळशीची पानांचा उपयोग करू शकतो.
  • तुळशीमध्ये असलेले इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या टुथब्रशचे असेही फायदे

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे