Share

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे

Published On: 

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे

जांभूळ हे एक रसरशीत असं छोटं गर्द जांभळ्या रंगाचं फळ आहे. ‘सिझिग्विम क्युमिनी’ असं शास्त्रीय नाव असलेलं हे मार्टासिए वर्गातील सदाहरीत झाडाचं फळ. जांभळाचं लाकूड हे जलरोधक व मजबूत असतं त्यामुळे बांधकामात व इतर ठिकाणी ते वापरलं जातं. जांभळापासून व्हिनेगर व वाईनही बनवतात. हे फळ आकाराने लांबट-गोलाकार असून फळाची चव आंबट-तुरट, गोड, थोडी जिभेला झिणझिण्या आणणारी असते.

दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं – बच्चू कडू

जांभळाचे आरोग्यदायी फायदे…

  • जांभळामध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते.
  • जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो.
  • जांभळाच्या झाडाच्या सालाची आणि बियांची पावडर पोटाच्या विकारावर गुणकारी असते. डायरिया, अपचन, जुलाब यांसारख्या आजारात ती फायदेशीर ठरते.
  • पांडुरोग व कावीळ झालेल्या रुग्णांसाठी जांभळं हितावह असतात.
  • जांभळाच्या रसामुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात. पण ते वातकारक असल्याने जपून खावे.
  • उन्हाने उष्णतेचा त्रास होत असल्यास जांभूळ खाल्ल्यावर तरतरी येते.
  • जांभळाच्या झाडाच्या सालीची राख ही दातांसाठी चांगली असते.

महत्वाच्या बातम्या – 

कोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक , जाणून घ्या फायदे

आदिवासींच्या विकासाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – प्राजक्त तनपुरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
फळेआरोग्यबातम्या
जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे

🕘 संबंधित बातम्या