Share

उन्हाळ्यात रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे, जाणून घ्या फायदे….

Published On: 

🕒 1 min read

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. ताक हे दही किंवा सायीपासून बनवता येते. दही घुसळून त्याचे ताक बनवले जाते. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. प्रत्यक्ष इंद्रालाही ताक दुर्लभ झाले होते, असे संदर्भ संस्कृत साहित्यात आढळतात.

ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, ईथे खनिजे, रायनॉप्लेरीन व्हिटॅमिन, फोलेट ‘‘अ’’, ‘‘ब समूह’’ ‘‘ड’’ व ‘‘क’’ ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. ताक चाट मसाला टाकूनही आपण पिऊ शकतो.

ताक सेवनाचे भरपूर फायदे 

  • ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
  • लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून पिल्याने त्रास कमी होतो.
  • दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
  • ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
  • ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
  • थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
  • रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
  • ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
  • लहान मुलांना दात येते वेळी त्यांना दररोज 4 चमचे असे दिवसभरातून 2-3 वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.
  • तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या