Share

‘शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’

Published On: 

‘शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’

🕒 1 min read

पुणे – राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीडित महिलांना अर्थसहाय्य, ऍट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ओबीसींना आरक्षण, एससी-एसटी मधील पदोन्नतीतील अनुशेष भरावा अशा विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बुधवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन व तीव्र निदर्शने करण्यात आली. रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्यभर सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, मोहन जगताप, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, नगरसेविका हिमाली कांबळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, सरचिटणीस बाबुराव घाडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

राज्यभर आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे. ओल्या दुष्काळाने शेतकरी त्रस्त आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. ऍट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ओबीसी समाज आरक्षापासून वंचित आहे. महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळांना निधी नाही, रेशनिंग देण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आहे. अनुसूचित जाती-जमातींमधील अनुशेष भरला जात नाही. महाविकास आघाडी सरकारने या मागण्यांची त्वरित पूर्तता करावी. अन्यथा आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असे बाळासाहेब जानराव म्हणाले,

राज्य सरकार केवळ एकमेकांची मनधरणी करण्यात आणि भाजपवर टीका करण्यात गुंग आहे. राज्यातील शेतकरी, महिला संकटात आहेत. जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ राजकारण करण्यात यांना अधिक रस आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलायला कोणी तयार नाही. सगळ्याच पातळ्यांवर हे राज्य सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे या सरकारने जनतेची माफी मागून राजीनामा द्यायला हवा.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या

Join WhatsApp

Join Now
‘शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’

🕘 संबंधित बातम्या