Share

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत २०३.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन

Published On: 

मुंबई – यंदा राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर राज्यात तब्बल १७२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १७२ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ८६ खासगी व या मध्ये राज्यातील ८६ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. तर राज्यात  ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत तब्बल २०३.४३  लाख टन उसाचे गाळप तयार करण्यात आले आहे.

राज्यात ३० नोव्हेंबर पर्यंत तब्बल २०३.४३  लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती मिळाली आहे,  तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.१५टक्के इतका आहे.

राज्यात ३० नोव्हेंबर पर्यंत सर्वाधिक ४१ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरु झाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, राज्यात ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ५१.८९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ४२.८८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील  साखर उतारा ८.२६ टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)साखर (Sugar)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या