भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव; नागरिकांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले ‘हे’ आवाहन

कोरोना

नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. अनेक देशामध्ये ह विषाणू पसरला आहे. यातच भारतमध्ये देखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकामध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याने भारतसमोरील चिंता आता अधिकच वाढली आहे.

केंद्र सरकारने याबाबतची माहीती गुरुवारी दिली. या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. कर्नाटकातील ओमिक्रॉनचे लक्षण असलेल्या दोन पुरुषांना तीव्र लक्षणे नोंदवण्यात आलेली नाहीत. मात्र या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेण्यात यश आले असून त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत, असे cआरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.

भारतात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले असले तरी लोकांनी भयभीत न होता कोरोना प्रतिबंधांचे नियम पाळावेत आणि लसीकरण करून घ्यावे, घाबरून जाण्याची गरज नाही, पंरतु त्याविषयी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोना नियमांचे पालन करावे आणि गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांच्याशी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी गुरुवारी आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्याबाबतही चर्चा केली, असे बोम्मई यांनी सांगितले. गेल्या आठवडय़ात भारतासह दक्षिण आशियात उर्वरित जगाच्या तुलनेत ३.१ कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (३० नोव्हें.) रात्री ओमिक्रॉनचा धोका व प्रसार टाळण्यासाठी मार्गदर्शक नियमावली जाहीर केली होती. त्यात कोणत्याही देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर ‘आरटीपीसीआर’ चाचणी आणि १४ दिवसांचे गृहविलगीकरण बंधनकारक करण्यात आले होते. त्याचबरोबर देशातील कोणत्याही भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना ४८ तासांपूर्वीचा ‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवाल सक्तीचा करण्यात आला होता. परंतु राज्य सरकारच्या या निर्बंधांवर नाराजी व्यक्त करणारे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या आरोग्य विभागाला पाठवले.

महत्वाच्या बातम्या –