Share

आरोग्य मंत्रा : लवंग एक फायदे अनेक…

Published On: 

🕒 1 min read

 टीम महाराष्ट्र देशा : आजच्या या आरोग्य मंत्र मध्ये आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यात हमखास असणारी लवंग विषयी. जरी आकाराने लहान असली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असून आयुर्वेदामध्ये तिला खूप महत्व आहे. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते.

  • आपल्या घरी आपले आजी आजोबा असतात. त्यांना अधिक वेळा सांधेदुखी गुडघेदूखी होत असते, त्यावर उपाय म्हणून आपण लवंगचे तेल त्या जॉईंटवर लावल्यास त्यांचा बर्यापैकी त्रास कमी होतो.
  • ज्या लोकांना जळजळ म्हणजे ऍसिडिटी ची समस्या असते, त्यांनी 100 ग्राम पाण्यामध्ये लवंग चा खिस करून चांगले मिसळून प्यावे. यामुळे तुमची ऍसिडिटी लवकर  बरी होईल.
  • थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला सर्दी खोकल्याचे त्रास होतात, त्यासाठी लवंगाच्या तेलाचा एक थेंब जर कपड्यात बांधून ठेवा, जेव्हा आपले नाक बंद होईल किंवा सर्दी झाल्यास एकदा वास घेतला तर आपले नाक पटकन मोकळे होते.
  • लवंग मध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात ज्यामुळे स्कीन साँफ्ट आणि शायनी होते.
  • लवंग मध्ये ‘विटामिन ए’अधिक असते त्यामुळे डोळ्यांची शक्ती टिकवून ठेवण्यात मदत करते.

https://maharashtradesha.com/know-these-benefits-of-the-tak/

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या