सर्दी, खोकला, ताप, कप झाला आहे का ?; हे करा जबरदस्त घरगुती उपाय !

सध्या हवामान खूप बदलत आहे(The weather is changing a lot)  हिवाळ्यात पडणारा पाऊस दुपारी असणारे प्रचंड ऊन गरम होणे. ह्या अश्या हवामानामुळे तुम्हाला सर्दी,खोकला, ताप कफ होऊ शकतो जर तुम्हाला हे लक्षण जाणवत असतील तर तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकतात.

हवामान बदलामुळे आपल्यला सर्दी व खोकला हॊतॊ ताप हमखास येते. ह्या लक्षणां समोर आपल्यला सामोरे जावे लागते. आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. पण कमी प्रमाणात जर हे लक्षणे असतील तर तुम्ही घरच्या घरी लवकर बरे होऊ शकता. तर आपण ह्या आजरांवर प्रभावशाली घरगुती उपाय बघुयात.

ज्यावेळेस आपल्याला सर्दी, खोकला झालेला असतो तेव्हा आपली पचन करण्याची क्रिया हि कमी झालेली असते त्यावेळेस तुम्ही हलके अन्न खा यामुळे तुमच्या पचन क्रिये वर भाग पडणार नाही. तुम्ही म्हणाल हलके अन्न म्हणजे काय तर हलक्या अन्नात तुम्ही डाळ भात किंवा तूप भात खाऊ शकता.

सर्दी खोकला झालेला असल्यामुळे अशावेळी तुम्हाला थंड व पचण्यासाठी जड असणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे कारण यामुळे तुमच्या पचनक्रिये वर भार पडला जाऊ शकतो. म्हणून दूध, मास आणि तळलेले पदार्थ हे आपल्याला लवकर पचण्यास अडचण निर्माण करतात . त्यामुळे तुम्हाला ज्या वेळी ताप आला आहे तुमच छातीमध्ये कप तयार होऊन सर्दी खोकला झाला आहे असे वाटत असेल त्यावेळी असे पदार्थ खाणे टाळावे(Avoid foods.).

सर्दी आणि खोकला हे इन्फेक्शन झाल्यामुळे होते त्यामुळे तुम्ही जेवणापूर्वी स्वच्छ हात धुवावेत आणि त्याच बरोबर तुमचे नखे वाढले असतील तर ते कमी करावेत. कारण नखा मधील घाण आपल्या पोटामध्ये जाते आणि त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आपल्याला रस्त्यावरील आणि बाहेरील उघड्यावरचे अन्न खाणे बंद करायचे आहे.

छातीमध्ये कप झालेला असल्यास आणि त्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्यास तर अशावेळी पाणी घ्यावे आणि त्यामध्ये चार-पाच तुळशीची पाने त्याचबरोबर थोडीशी काळी मिरी आणि एक-दोन लवंग, बडीशेप आणि दालचिनी टाकावे. हे पाणी उकळून याचा काढा तयार करून घ्यावा , हा काढा तुम्ही दिवसभर थोडा थोडा प्राशन करायचा आहे त्यामुळे कप हळूहळू कमी होतो.

थोडक्यात बघुयात घरगूती उपाय.(Let’s take a look at some home remedies.)

१ ) खोकला – अर्धा चमचा काळीमिर्च घेऊन मधा सोबत घ्या.

२ ) तोंडात छाले तयार झाल्यास हे करा – जायफळ चा काढा तयार करून गुळणा करावा.

३ ) दुखापत झालेली असेल – दुखापत झालेली असेल तिथं हळदीला तेल मध्ये कोमट गरम करून लावा.

४ ) उलटी होत असल्यास – लवंग ला पाण्यात उकळून प्यावे.

५ ) पोट दुखत असल्यास – जिरे आणि साखर दोन्ही मिश्रण चावून खावा हा रामबाण उपाय आहे. पॉट दुखणे थांबतेच

६ ) जास्त काळापासून ताप येत असेल तर – जिऱ्यासोबत गूळ मिश्रित करून खावा.

७ ) शौचास जळजळ होत असल्यास – छोटी विलायची घेऊन चूरन बनवून पाण्यासोबत घ्या.

८ ) पित्त – हिंग ला तुपासोबत घ्या.

९ ) उचकी लागल्यास – अद्रक चोखा .

१० ) निमोनिया – हिंग पाण्यासोबत घोळवून प्या.

११ ) चक्कर येत असल्यास – सोफ सोबत साखर मिश्रण करून घ्यावी.

वरील माहिती हि घरच्या घरी इलाज करण्यासाठी आहे. जरी २ दिवसापुढे सातत्याने आजार असेल तर डॉक्टरांचा आपण सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या –