बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावली

कृषी उत्पन्न बाजार समित्यांपेक्षा सोसायटीमध्ये धानाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल विविध कार्यकारी सोसायट्यांकडे वाढला आहे. परिणामी बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते.

विंचूर एमआयडीसीत प्रतिवर्षी १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून शेतमाल निर्यात केला जाणार

एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यावर्षी वेगळेच चित्र दिसून येत आहे. शासनाने यावर्षी काही सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १ हजार ८३५ अधिक ५०० बोनस असे असल्याने शेतकरी आपले धान सोसायटीमध्येच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सरकारनं शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला नाही, उलट त्यांच्या गळ्यात फास अडकविला – सुप्रिया सुळे

उलटपक्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाचे भाव १ हजार ९०० ते २ हजार रूपयांच्या पलिकडे नसल्याची माहिती आहे. दरामधील ही तफावत लक्षात घेता बहुतांशी शेतकºयांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायट्याकडेच वळविला आहे. ज्या सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले. त्यामध्ये नवखळा, चिंधी चक, गोविंदपूर, कोजबी , गिरगाव, सावरगाव, जीवनापूर, बाळापूर येथील आदिवासी सोसायट्यांचा समावेश आहे.