Share

थंडीच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायला हवा चिकू!

Published On: 

थंड गुणधर्म असलं तरीही हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीनं खाल्ल जाणारं फळ म्हणजे चिकू. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही खातात. चिकूपासून कोशिंबीरही केली जाते. चिकू या फळापासून व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला मिळतं. जे अॅन्टिबॅक्टेरियल म्हणून शरीरात काम करतं. हिवाळ्यात चिकू अनेत आजारांपासून दूर ठेवतं जाणून घेऊया काय आहेत चिकू खाण्याचे शरीराला फायदे. थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या निरुत्साही असलेल्या व्यक्तींनी रोज एक चिकू खाणं आवश्यक आहे.

  • चिकूतील कॅल्शियम आणि फॉस्फरस शरीरातील लोहाचं प्रमाण संतुलित ठेवतं. त्यामुळे हाडांना मजबुती मिळते.
  • डोळ्यांसाठी चिकू खाणं फायदेशीर असतं. दृष्टी चांगली होते. यासोबत चिकूतील पोषक तत्व शरीरातील अनेक इन्फेक्शन होण्यापासून दूर ठेवतात
  • तुम्हाला अपचनाची अथवा गॅसची समस्या असेल तर आवर्जुन चिकूचं सेवन करा.पित्तनाशक गुणधर्म असल्याने जेवणानंतर हे फळ खाल्ले जाते. तसेच हृदयासंबंधी आजारापासून संरक्षण करते.
  • कफ आणि श्वासनासंबंधी आजार दूर करण्यासाठी चिकू फायदेशीर ठरतो. सर्दी झाली असेल तरी हे फळ खाणे उपयुक्त ठरते. चिकूतील ई व्हिटॅमिनमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते.
  • चिकू खाल्ल्यानं लहान मुलांना ताकद तर मिळतेच पण मानसिक ताण कमी होतो असंही समजलं जातं. याशिवाय झोपही शांत लागते. अशक्तपणा ज्यांना आहे अशा व्यक्तींनी तर केळ चिकू सारखे पदार्थ खाणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्या (Main News) आरोग्य विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या