Share

तुम्हाला माहित आहे का खरबूज खाण्याचे फायदे? जाणून घ्या

Published On: 

तुम्हाला माहित आहे का खरबूज खाण्याचे फायदे?  जाणून घ्या

🕒 1 min read

पिवळसर रंगाचे रसदार, चवदार व थंड असे खरबूज म्हणजे निसर्गाने उन्हाळ्यासाठी आपल्याला दिलेले एक वरदानच म्हणायला हवे. इंग्रजीमध्ये मस्कमेलन, संस्कृतमध्ये खरबुजा तर शास्त्रीय भाषेत कुकुमिस मेलो या नावाने हे फळ ओळखले जाते.  हे फळ लंबगोल, अंडाकार, पिवळे, चट्टय़ा-पट्टय़ांचे, गोड व थंड असे फळ आहे. एक वेगळ्या प्रकारचा सुगंधही त्याला असतो. चला तर जाणून घेऊ फायदे…

  • खरबूज हे अल्कली गुणधर्मयुक्त असल्याने आम्लपित्ताच्या विकारावर ते उपयुक्त आहे. आम्लपित्त झाले असेल किंवा कायम होत असेल तर खरबूज भरपूर खावे.
  • खरबुजाच्या बिया या बडीशेपसोबत मुखवासासाठी खाव्यात किंवा त्या बदाम पिस्त्यासारख्या खाता येतात तसेच मिठाई सजविण्यासाठीदेखील त्याचा वापर करता येतो.
  • खरबुजाच्या सालीचा उपयोग मूत्रावरोधामध्ये होतो.  सालीसह खरबूज पाण्यात कुस्करून, गाळून ते पाणी रुग्णाने प्यायल्यास लघवी भरपूर व साफ होते.
  • खरबूज रोज भरपूर प्रमाणात खाल्ल्याने त्यात असणाऱ्या उष्मांकामुळे वजन वाढीस लागते. म्हणून कृश व्यक्तींनी सुडौल बांधा होण्यासाठी नियमित खरबूज खावे.
  • खरबूज हे शीत गुणधर्माचे फळ असल्यामुळे उष्णतेचे विकार दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याआरोग्यविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
तुम्हाला माहित आहे का खरबूज खाण्याचे फायदे?  जाणून घ्या

🕘 संबंधित बातम्या