उत्तम आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, जाणून घ्या एका क्लिकवर..

उत्तम आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, जाणून घ्या एका क्लिकवर.. Brown sugar and white sugar the differences and which one 1024x584 1

पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे.

तसेच भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ गुळ आहे. पण हळूहळू आता गुळाची जागा ही आता साखरेने घेतली आहे. त्यामुळे गुळातील जे पोषणतत्त्व आहेत ते हळूहळू गायब होताना दिसत आहेत. पण साखर विषासारखे काम करते  साखरेचे दुष्परिणाम हे शरीरात वाढत जात आहे. त्यामुळे साखर हे अनेक आजारांचे कारण ठरत आहे. चला तर मग पाहुयात उत्तम आरोग्यासाठी गुळ हा किती फायदेशीर आहे तो……. • रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.
 • जर वजन कमी करायचं असेल तर साखरेच्या चहाचं न पिता करता गुळाच्या चहा पिऊ शकता.
  वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
 • गुळामध्ये कॅल्शिअम आणि लोहाचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित राहते.
 • मासिकपाळी दरम्यान पोटदुखी होत असल्यास गूळ खाल्ल्याने त्रास कमी होतो.
 • शरीरातील धातुंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो
 • शरीरात हिमोग्लोबीन कमतरता असल्यास गूळ खाऊन ती दूर केली जाऊ शकते. गूळ, शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबीन लवकर वाढते. त्यामुळे साखरपेक्षा गुळाला पसंती द्यायला हवी.
 • घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खल्ल्याने आराम मिळतो.
 • सांधेदुखीचा जर तुम्हाला त्रास असेल तर 1 ग्लास दुधाबरोबर गूळघ्या त्याने तुमचे हाडं मजबूत होतात.
 • आल्यासोबत गुळाचे सेवन केल्याने देखील सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
 • जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते.

महत्वाच्या बातम्या –