शेती पिकासाठी खर्च जास्त शेतकरी हवालदिल

शेती पिकासाठी खर्च जास्त शेतकरी हवालदिल

दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी कांदा लागवड यंदा मात्र अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टी व वातावरणातील बदलाने कांदा रोपे बहुतांश प्रमाणात खराब झाल्याने, लागवड उशिरा सुरू झाली. आणि अजूनही तशी आहे. अशा परिस्थितीत कांदा रोप लागवड सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांपुढे मजूरटंचाईचा प्रश्न आहे.

कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मजूर वर्ग ऊस तोडणीसाठी बाहेर गेल्याने, मजूर मिळत नाही. मजुरी वाढल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. सध्या 300 ते 400 रुपये रोज देऊन, बाहेरून मजूर मागवले जात आहेत. व गाडी भाडे देखील शेतकऱ्याचा द्यावे लागते आहे. याप्रमाणे बियाणे, खते ,लागवड खर्चा यात वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. परंतु मागील वर्षाचा अवकाळी अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

त्यामुळे कांदा पिकास भाव असूनही कांदा पीक न परवडणारे झाले आहे. हा सर्व मेळ बघता शेतकरी मेटाकुटीस आला असून, यंदा फेब्रुवारीच्या पहिला आठवड्यापर्यंत पर्यंत कांदा लागवड सुरू राहील असे चित्र आहे.

लोणी खा निरोगी रहा : लोणी खाण्याचे हे आहेत फायदे….