पिकांवरील दवामुळे बळीराजा धास्तावला

ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा नवीन वर्षातही कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दाट धुके व दव पडत असून, हे धुके दुपारपर्यंत कायम दिसत होते. या दव व धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा व कांदा रोपांवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच तयार द्राक्षबागांवर डावणीचे प्रमाण वाढल्यामुळे कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, पूर्णत: हतबल झाले आहे.

ढगाळ वातावरण आणि धुक्‍यामुळे रब्बी पिके धोक्‍यात

सकाळी पडणाऱ्या या नयनरम्य धुक्यामुळे पिकांची वाट लागली असून, उत्पादनात घट येण्याची धास्ती निर्माण झाल्याने बळीराजा संकटात आला असून, त्याची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे शेतकरी पिकांवर महागडी औषधे फवारत आहेत, त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, मात्र आता तो पूर्णपणे हतबल झाला असून, पिकांवर किती वेळा महागड्या औषधांची फवारणी करायची, असा सवाल करत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन, कांदा ही सर्व पिके पावसामुळे सडून गेल्याने खराब झाली.

परदेशातून कांदा आयात करणे हे सरकारचे चुकीचे धोरण-जितेंद्र आव्हाड

शेतकऱ्यांच्या हाती दमडीही आली नाही. खरिपासाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला, असे असतानाही शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची लागवड केली. गेल्या दोन महिन्यापासून असलेले ढगाळ हवामान, पाऊस, दाट धुके व दवामुळे रब्बी हंगामातील, कांदा व कांदारोप, हरभरा व भाजीपाला पिके खराब झाल्याने उत्पादनात घट निर्माण होण्याची भीती शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.