कधी ऐकले आहे का जांभळाच्या बियाचे फायदे, जाणून घ्या

जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंडस असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. चला तर मग जाणून घेऊ जांभळांच्या बियांचे आरोग्यदायी फायदे……

  • जांभळाच्या बियांची पावडर गायीच्या दूधात मिक्स करुन हा लेप चेहेऱ्याला लावल्यास चेहेऱ्यावरच्या मुरुम, पुटकुळ्या निघून जातात.
  • जांभळाच्या बिया धुवून उन्हात वाळवून घ्या. वाळल्यानंतर बियांचे बारीक तुकडे करा. यानंकर हे तुकडे मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पावडर सकाळी उपाशीपोटी पाण्यात टाकून घेतल्यास फायदेशीर ठरते.
  • जांभळाचं ज्यूस पाण्यात घालून ते पाणी त्वचाविकारात त्वचेला लावल्यास फायदेशीर ठरतं.
  • तोंडाला बॅक्टेरिया मुक्त ठेवण्यासाठी, स्वस्थ हिरड्यांसाठी जांभळांच्या बियांच्या पावडरने दंतमंजन केल्यास त्याचा फायदा होतो.
  • जांभूळ थंड फळ असल्यानं पोटातील आग आणि अपचन यावर उपयोगी असतं.
  • जांभळाच्या झाडाच्या सालाची आणि बियांची पावडर पोटाच्या विकारावर गुणकारी असते. डायरिया, अपचन, जुलाब यासारख्या आजारात ती फायदेशीर ठरते.

महत्वाच्या बातम्या –