हे आहेत पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे ……

पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया ( carica papaya ) असे आहे. त्याचे कुळ केरीकेसी ( Caricaceae ) हे आहे पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई खाण्याचे खूप फायदे आहेत. पपई हे फळ सगळी कडे उपलब्ध आहे. पपई हे आजारपणात देखील खाता येते आणि याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. पपईचे सर्वात जास्त उत्पादन भारतामध्ये केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये सर्वात जास्त उत्पादन केले जाते.

पपई खाण्याचे फायदे :

  • रोगप्रतिकारशक्ती वाढते –
    आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा 200% अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.
  • मधुमेहींसाठी गुणकारी –
    पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून बचाव होतो.
  • डोळ्यांचे आरोग्य सुधारते –
    पपईमध्ये व्हिटमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्‍यता असते. या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा.
  • शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते –
    पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृद्यविकाराचा धोका संभवतो.
  • वजन घटवण्यास मदत होते –
    एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.
  • सांधेदुखीपासून आराम मिळतो –
    पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.
  • पचन सुधारते-
    आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा बाहेरचे जेवण टाळणे हे काहीसे कठीण आहे. त्यामुळे अशा खाण्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्‍यता असते. अशावेळी पपई खाल्ल्याने अरबट-चरबट खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते.
  • कर्करोगापासून बचाव होतो- 
    पपईमधील ऍन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून तुमचा बचाव करते. तसेच पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते.
  • ताण-तणाव कमी होतो –
    दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.

महत्वाच्या बातम्या –

कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पिकांची आंतरमशागत

कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…

किवी फळ खाण्याचे हे गुणकारी फायदे