पुदिन्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही कधी ऐकले आहे का?

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे . हिचे कुळ लॅमिएसी (Lamiaceae) आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे.पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी,वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी,दातदुखी, वातविकार इत्यादि याचे सेवनाने बरे होतात. वांतीहारक म्हणून व आम्लपित्तातही याचा चांगला प्रभाव पडतो.

आतड्यांचे रोगातही हा उपकारक आहे.तुळशीच्या पानासारखेच, विषारी कीडा चावल्याच्या जागी हिची पाने चोळल्यास, कीडा चावल्यामुळे होणारी आग व कंड कमी होतो.या वनस्पतीचा स्वयंपाकातही वापर होतो.पाणीपुरी, कैरीची चटणी, जलजीरा आदींमध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे.स्वयंपाकातील अन्य पदार्थांसाठीही याचा वापर होतो.भारतात, उन्हाळ्यात याचा वापर जास्त करण्यात येतो.

पुदिन्याचे फायदे – 

  • पुदिन्यामध्ये असलेले फायबर आपले कोलेस्ट्रॉल (चरबी ) चे प्रमाण कमी करण्यास मदत करतात, तसेच याच्यात उपलब्ध असलेले मॅग्नेशियम आपली हाडे मजबूत करतात.
  •  जर कोणाला उलटी होत असेल तर २ चमचे पुदिना दर २ तासात त्या व्यक्तीला द्या यामुळे त्याची उलटी थांबेल व त्याला बरे वाटेल.
  •  जर आपल्याला पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.
  • कॉलरा झाला असेल तर कांद्याचा रस व लिंबाचे रस पुदिन्याच्या रसा सोबत मिसळवून प्यायल्याने आराम मिळतो.
  • सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळा मीठ मिळवा आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळूवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.
  • मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुखी पाने घ्या व त्याचा चूर्ण बनवा आणि दिसातून दोन वेळा मधात मिसळवून तो नियमित पणे काही दिवस घ्या असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.
  • जर कोणाला खूप वेळ उचकी येत असेल तर त्याला पुदिन्याची काही पाने खायला सांगा त्यामुळे त्याची उचकी बंद होईल.
  • जर कोणाला जखम झाली असेल तसेच खरचटले असेल तर त्याच्यावर पुदिन्याची ताजी पाने वाटून  घेऊन लावा यामुळे जखम लवकर माठेल.
  • जर आपल्याला गजकर्ण, खाज तसेच अन्य प्रकारचे त्वचेचे रोग असतील तर ताजा पुदिन्याची पाने घेऊन ती चांगली वाटून घ्या आणि हा लेप ज्या ठिकाणी खाज किंवा गजकर्ण झाल असेल तिथे लावा आपल्याला लगेच आराम मिळेल.
  • पुदिन्याच्या रस मिठाच्या पाण्यात मिसळवून गुरळ्या करा, असे केल्याने आपला आवाज बसला असेल तर तो ठीक होईल.
  •  उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे फायदे:-  कधी कधी गरमीच्या दिवसात अस्वस्थ तसेच घाबरल्या सारखे होते. त्यासाठी काही पुदिन्याची पाने तसेच अर्धा चमचा वेलचीचे चूर्ण एक ग्लास पाण्यात घेऊन ते उकळवा आणि ते पाणी गार झाल्यावर प्या, असे केल्याने आपल्याला बरे वाटेल.
  • जर आपल्या तोंडाला  वास येत असेल तर पुदिन्याची पाने घ्या त्यांना सुकवून घ्या आणि त्याचा चूर्ण बनवा आणि याचा तुम्ही मशेरी सारखा वापर करा. असे केल्याने तुमच्या हिरड्या मजबूत होतील आणि तोंडाची दुर्गंध बंद होईल, असे तुम्ही एक महिन्याहून अधिक काळासाठी करा आपल्याला याचा फायदा नक्की होईल.

सौदर्य वाढवण्यासाठी पुदिन्याचा उपयोग –

जर आपली त्वचा तेलकट असेल तर पुदिन्यापासून बनवलेला फेशियल आपल्यासाठी चांगला ठरेल, दोन मोठे चंमचे पुदिन्याचे वाटण आणि दोन चमचे दही तसेच एक मोठा चमचा ओट मील (ओटचे जाडे भरडे पीठ) यांना मिसळवून याचा जाड लेप बनवा आणि हा लेप १५ मिनिटासाठी आपल्या चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या आठवड्यातून कमीत कमी असे दोन वेळा करा. आपल्या त्वचेचा तेलकट पणा कमी होईल, तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील.पुदिन्याचा रस मुलतानी माती सोबत मिसळवून त्याचा चेहऱ्यावर फेशियल सारखा वापर केल्याने त्वचेचा तेलकट पणा कमी होईल तसेच सुरकुत्या कमी होतील आणि आपल्या चेहऱ्याची चमक वाढेल.

महत्वाच्या बातम्या –