आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम

आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, अॅन्टी-ऑक्सिडेट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात १० ml आवळ्याचा ज्यूस मिसळून पिण्याने शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर जाण्यास मदत होते.

थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे फायदेशीर

आवळा, आवळ्याचा ज्यूस उच्च रक्तदाब, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी आहे. अनेक डॉक्टर हाय ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.गर्भवती असताना महिलांना सकाळी झोपून उठल्यावर अनेकदा त्रास होतो. मॉर्निंग सिकनेसपासून बचाव करण्यासाठी आवळा उत्तम उपाय आहे. सकाळी उठल्यावर चक्कर किंवा उलटीसारखं होत असल्यास कच्चा किंवा सुकवलेल्या आवळ्याचा एक तुकडा खाल्याने फरक जाणवतो.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान ; मात्र मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत

पचनासाठी आवळा नैसर्गिक उपाय आहे. नेहमीच अपचनाचा त्रास होत असल्यास २ ते ३ आवळ्याचे तुकडे खावेत. डायजेस्टिव गोळ्या किंवा अॅन्टाअॅसिड औषधांपेक्षा आवळा उत्तम उपाय आहे. आवळा पचनतंत्रामध्ये गॅस्ट्रिक लिक्विड उत्पन्न करण्यास मदत करतो. हे लिक्विड पचन प्रक्रिया वाढवण्यास मदत करतं. बद्धकोष्टता, गॅस, अॅसिडिटी, पोटासंबंधी अनेक समस्यांमध्ये  आवळा फायदेशीर ठरतो. ज्या लोकांना सतत तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे. सुख्या आवळ्याचे तुकडे जवळ ठेवा. ज्यावेळी दुर्गंधी जाणवेल त्यावेळी २ ते ३ आवळ्याचे तुकडे खा. अॅन्टी-इन्फ्लेमेटरी तत्त्व असलेला आवळा दुर्गंधीचं कारण बनणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतो.