हळदीचे दुध पिण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या

सर्दी होण्याच्या समस्येवर ‘हळदीचे दूध’ हा एक रामबाण उपाय आहे. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे.दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. हळद ही अॅंटीबायोटीक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे अनेक दुहेरी होतात.ह्ळदीतील जंतूनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊ फायदे….

  • हळद युक्त दूध घेतल्यामुळे पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात. अल्सर आणि कोलाइटिस बरे करण्यास मदत करते. अल्सर, डायरिया आणि अपचन समस्या दूर होतात.
  • हळद टाकलेले दुध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम आणि मिनिरल तसेच पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.
  • झोप न येणे ही अनेकांची समस्या असते. पण जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.
  • आयुर्वेदात हळदीला महत्व दिले गेले आहे. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते.
  • सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो. थंडीमध्ये हळदीचे दूध प्यायल्याने यापासून तुमचा बचाव होतो.
  • शरीराचा कोणताही भाग जर दुखत असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने आराम मिळतो. अशा वेळेस रोज झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यायल्याने फायदा होतो.

महत्वाच्या बातम्या –