थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

सुकलेलं आलं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सुकलेल्या आल्याच्या पावडरलाच सुंठ (Ginger) बोललं जातं. सुंठदेखील आल्याप्रमाणेच गरम असते. उन्हाळ्याच्या दिवसांत सुंठेचं कमी, तर थंडीच्या दिवसांत अधिक सेवन फायदेशीर ठरतं.

नैसर्गिक पेनकिलर –

सुंठ Ginger एक नैसर्गिक, नॅच्युरल पेनकिलर असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुंठेमध्ये दुखणं कमी करण्याचे औषधीय तत्व असतात. अनेकदा महिलांना मासिक पाळीदरम्यान सुंठ असलेला चहा घेण्याचा सल्ला दिला जातो.

गर्भावस्था – 

गर्भावस्थेमध्ये सुंठेचा फायदा होऊ शकतो. गर्भावस्थेमध्ये गॅस, पोटासंबंधी अनेक समस्या होत असतात. अशावेळी सुंठ पावडर महिलांना पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी मदत करते.

पोटासंबंधी आजार –

गॅस, अपचन, अतिसार यांसारख्या इतरही पोटाच्या समस्यांसाठी सुंठेचा उपयोग केला जाऊ शकतो.

डोकेदुखी – 

डोकेदुखीवरही  सुंठ आराम देते. सुंठेमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामुळे रक्ताभिसारण सुरळित होतं. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्याने आणि रक्ताभिसरण सुरळित होत असल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते.

मधुमेह –

आल्यामध्ये असलेले एक्टिव्ह कंपाउड्स इन्सुलिन आणि मेटाबॉलिज्म उत्तम ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे मधुमेहाचा धोका कमी केला जाऊ शकतो.

कोलेस्ट्रोल – 

ड्राय जिंजरमुळे कोलेस्ट्रोल कमी होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. सुंठेमुळे शरीरात कोलेस्ट्रोलचं प्रमाण आणि ब्लड शुगर योग्य प्रमाणात राहते.

रोगप्रतिकारशक्ती –

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुंठ फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसांत इम्यून सिस्टम कमकुवत होते, परिणामी सर्दी, खोकल्यासारखे आजार होतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुंठेचा उपयोग करु शकता.

महत्वाच्या बातम्या –