Share

साखर उत्पादनात कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर; आतापर्यंत १६९ लाख टन साखर उत्पादन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  ऊस गाळपासह साखर उत्पादनात  कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. कोल्हापूरजिल्ह्यामध्ये तब्बल १५०.२६ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १६९.९१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. कोल्हापूर सरासरी साखर उतारा ११.२७ टक्के इतका आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १९ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल १९२ साखर कारखाने (Sugar factory) उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९७ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९२ साखर कारखान्यांकडून ६२५.३८ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात १९ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल ६२०.८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ९.९३ टक्के इतका आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News) साखर (Sugar)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या