Share

जाणून घ्या किवी खाण्याचे फायदे

Published On: 

🕒 1 min read

किवी मध्ये ‘व्हिटॅमिन सी’नं परिपूर्ण असते. कीवी हे फळ आजकाल बाजारात अगदी सहज उपलब्ध होत आहे. किवी चिकूप्रमाणे दिसणारं फळ अगदी चविष्ट आहे. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचे आयुष्य वाढते. किवी फळात सर्व उपयुक्त तत्व आहेत. ज्याची शरीराला गरज असते. फळात व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक असल्यानं अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत मिळते. सोबतच हे फळ डिप्रेशनची समस्याही दूर ठेवतो.

कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…

हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खुप उपयुक्त ठरतो. कीवीच्या फळामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामधील अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांमधील घातक बॅक्टेरियांचा नाश करतात. कीवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. त्वचेची कांती सुधारते.

नागपूर शहरात ठिकठिकाणी तुंबले पाणी

कीवी फळाच्या सेवनामुळे घातक कोलेस्ट्रेरॉल घटक कमी होण्यास मदत होते. नियमित 8-10 आठवडे कीवीचे सेवन केल्यास कोलेस्ट्रेरॉलमुळे होणारा त्रास कमी होतो. रक्तदाबाचा त्रास नियंत्रणामध्ये ठेवण्यास कीवीचे फळ मदत करते. यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
फळेआरोग्यबातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या