Share

लिव्हर डॅमेज होण्यापूर्वी व्हा सावध: आठवडाभरात तंदुरुस्त करणारे हे घरगुती उपाय पाहा

Published On: 

Liver Health Tips: Healthy human liver illustration with fresh vegetables and home remedies.

Liver Health Tips: तुम्हाला माहितीये का? आपलं लिव्हर केवळ रक्त शुद्ध करत नाही. ते शरीराची मोठी यंत्रणा चालवतं. अन्न पचन. ऊर्जा साठवण. हार्मोन्स तयार करणं. हे सगळं लिव्हरच करतं. जर ते बिघडलं तर शरीर कोलमडतं. थेट जीवघेणी कावीळ होऊ शकते. अति मद्यपानाने तर कॅन्सरचा धोका असतो.

आपण अनेकदा याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळेच वेळीच सावध व्हा. शरीर निरोगी ठेवायचं असेल, तर आधी लिव्हर जपा. त्यातील विषारी पदार्थ बाहेर काढणं गरजेचं आहे. यासाठी काही सोपे मार्ग आहेत.

लिव्हर निरोगी ठेवणारे खास घरगुती उपाय

तुमच्या स्वयंपाकघरातच याचे उपाय दडलेले आहेत. दुधी भोपळा, हळद, धने आणि गुळवेल. हे सगळं एकत्र करा. त्यात चिमूटभर काळं मीठ टाका. हे साधं पेय शरीरातील सगळे विषारी पदार्थ बाहेर फेकून देतं.

दुसरीकडे, लिव्हरला सूज आली असेल तर आणखी एक उपाय आहे. गाजर आणि आवळ्याचा अर्क एकत्र करा. त्यात थोडं सैंधव मीठ मिसळा. याच्या नियमित सेवनाने अवघ्या आठवडाभरात लिव्हरची सूज कमी होते. (सैंधव मीठ – ज्याला सेंधा नमक किंवा रॉक सॉल्ट असेही म्हणतात. हे खडकांमधून आणि खाणींमधून मिळणारे अत्यंत शुद्ध आणि नैसर्गिक खनिज आहे. यामध्ये पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियमसारखी सुमारे ८४ खनिजे असतात. प्रक्रिया केलेल्या साध्या मिठाच्या तुलनेत हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते.)

रक्त कमी झाल्यावर ॲनिमिया होतो. यावर पालक आणि बीटचा ज्यूस खूप गुणकारी आहे. त्यात थोडी मिरेपूड नक्की टाका. याने रक्ताचं प्रमाण झपाट्याने वाढतं. शिवाय लिव्हरही एकदम तंदुरुस्त राहतं.

थोडक्यात सांगायचं तर, हे घरगुती उपाय खूप फायदेशीर आहेत. पण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे उपाय थेट करून पाहू नका. वैद्यकीय मदत नक्की घ्या.

महत्त्वाची टीप: बातमीत दिलेले घरगुती उपाय हे केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. वैद्यकीय मदत आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय यापैकी कोणतेही उपाय करू नका.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या