Besan & Honey Face Pack | बेसन आणि मधाचा फेस पॅक वापरून करा त्वचेच्या ‘या’ समस्या दूर

Besan & Honey Face Pack | टीम कृषीनामा: त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. यासाठी काही लोक घरगुती पद्धती वापरतात तर काही लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले प्रोडक्ट वापरतात. बाजारामध्ये उपलब्ध असलेले प्रॉडक्ट त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे बहुतांश लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय शोधत असतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही बेसन आणि मधाचा वापर करू शकतात. कारण या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. बेसनामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात. तर, मधामध्ये अँटिइफ्लेमेटरी, अँटिबॅक्टरियल आणि अँटिफंगल गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात.

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बेसन आणि मधाचा फेस पॅक वापरू शकतात. बेसन आणि मधाचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसन एका भांड्यामध्ये घ्यावे लागेल. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक चमचा गुलाबजल आणि दोन चमचे मध मिसळून घ्यावे लागेल. ही पेस्ट तुम्हाला घट्ट करून घ्यावी लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या फेस पॅकमध्ये गुलाब जल ऐवजी दुधाचा देखील वापर करू शकतात. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्या. तयार झालेला हा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने पुढील समस्या दूर होऊ शकतात.

त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो (Besan & Honey Face Pack For Dry Skin)

तुमची त्वचा जर खूप कोरडी असेल तर हा फेस पॅक तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हा फेस पॅक त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे नियमित या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचेवरील कोरडेपणा दूर होऊन त्वचा मुलायम होऊ शकते.

पिंपल्स दूर होतात (Besan & Honey Face Pack For Pimples)

तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स आणि डाग असतील तर हा फेस पॅक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या फेसपॅकच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊ शकतात.

त्वचा चमकदार होते (Besan & Honey Face Pack For Glowing Skin)

बेसन आणि मधाच्या फेस पॅकच्या वापराने त्वचेवरील पिगमेंटेशन, टॅनिंग इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. त्याचबरोबर नियमिति या फेस पॅकच्या वापराने त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते. आठवड्यातून तीन ते चार वेळा तुम्ही या फेसपॅकचा वापर सहज करू शकतात.

यासोबतच त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपाय देखील ट्राय करू शकतात (you can also try the following home remedies for skin care)

लिंबू (Lemon for skin care)

चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा उपयोग करू शकतात. यासाठी तुम्हाला एक लिंबू कापून घ्यावे लागेल. त्यानंतर ते पंधरा ते वीस मिनिटे त्या डागावर तसेच ठेवावे लागेल. लिंबामध्ये आढळणारे ॲसिड डेड स्कीन काढून टाकतो. परिणामी आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊ लागतात.

कांदा (Onion for skin care)

कांदा आपण नेहमी जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरत असतो. त्याचबरोबर कांदा तुमचं सौंदर्य देखील वाढवू शकतो. चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी कांद्याचा तुकडा घेऊन काळ्या डागांवर मसाज करा. कांद्यामध्ये आढळणारे आम्ल चेहऱ्यावरील काळे डाग करण्यासाठी दूर मदत करतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या